ज्ञानदेव पवार यांचा जन्म १ जून १९७० साली माणगांव तालुक्यात खांदाड या गावी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब शेती करून उदरनिर्वाह करत असे. लहानपणापासून ज्ञानदेव पवार यांना सामाजिक कार्याची आवड होती. १९९० पासूनच सक्रिय राजकारणात कार्यकर्ता म्हणून सहभागी. त्यांनी १९९५ साली माणगाव विकास आघाडी मधून माणगांव ग्रामपंचायत सदस्य पदाची निवडणूक लढविली आणि सदस्य म्हणून निवडून आले. २००० साली शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आणि माणगांव तालुक्याचे चिटनीस पदी त्यांची नियुक्ती झाली. २००० साली पुन्हा माणगांव विकास आघाडीतून सदस्य म्हणून निवडून आले यावेळी २००३-२००५ मध्ये उपसरपंच म्हनून ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला. २००५ साली पुन्हा माणगांव विकास आघाडीतून ग्रामपंचायत सदस्य म्हणून विजयी. २००७ साली जिल्हा परिषदेची निवडणूक तळाशेत गणातून निवडून आले त्याच बरोबर शेतकरी कामगार पक्षाचे पुढील ५ वर्ष पक्ष प्रतोद म्हणून काम केले. २०१२ साली पुन्हा जिल्हा परिषद निवडणूक विजयी होऊन २०१२ पासून पुढे अडीच वर्ष आरोग्य, क्रीडा व शिक्षण सभापती पदाची धुरा सांभाळली. २०१२ – २०१५ जिल्हापरिषद सदस्य पदाचा भार सांभाळला. २०१४ साली शेतकरी कामगार पक्षातून शिवसेनेत प्रवेश. २०१९ साली अपक्ष उमेदवार म्हणून श्रीवर्धन मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविली आणि पराभव झाला. २०२१ ला माणगांव नगरपंचायत निवडणुकीत नगसेवक म्हणून विजयी होत माणगांव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष म्हणून कार्यभार हाती घेतला.
ज्ञानदेव पवार
जन्म: ०१ जून १९७० (वय – ५३)
- साल १९९५-२००० सदस्य, माणगांव ग्रामपंचायत
- साल २०००-२००५ सदस्य, माणगांव ग्रामपंचायत (२००३-२००५ उपसरपंच)
- २००५-२००७ सदस्य, माणगांव ग्रामपंचायत
- साल २००७-२०१२ रायगड जिल्हा परिषद सदस्य
- साल २०१२ – २०१५ रायगड जिल्हा परिषद सदस्य ( २०१२ पासून अडीच वर्ष आरोग्य, क्रीडा व शिक्षण सभापती )

