
कपिल नरेंद्र गायकवाड
पाणी पुरवठा सभापती, माणगांव नगरपंचायत
माणगाव नगरपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी उतेखोल गावामध्ये 3.5 दशलक्ष लिटर प्रति दिवस क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र कार्यरत आहे. सदरच्या जलशुद्धीकरण केंद्र वाकडाई मंदिर जवळ काळनदी परिसरात अस्तित्वात असलेल्या जॅकवेल मधून 35V च्या 25 HP पंपाद्वारे पाणी उपसा केला जातो. जलशुद्ध केंद्रावर Rapid Sand Filter या तंत्रज्ञानाचा अवलंब करून पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. प्रति दिवशी सुमारे 35 लक्ष लिटर पाणी शुद्ध करून नागरिकांना पुरवठा केल जाते. पाणी वितरित करणेकामी जलशुद्धीकरण केंद्रावर 3 पाण्याच्या टाक्या व दत्तनगर येथे 1 पाण्याची टाकी अशी एकूण 4 पाणी साठवण टाक्या आहेत. सदर योजनेद्वारे हद्दीतील अनुक्रमे खांदाड, जुने माणगांव, नानोरे, भादाव व उतेखोल या गावांना पाणीपुरवठा केला जातो.
पाणीपुरवठा वेळापत्रक
| सकाळी ४.०० ते ५.३० वाजेपर्यंत | विकास कॉलनी |
| सकाळी ५.३० ते ७.३० वाजेपर्यंत | उतेखोल गाव / भादाव |
| सकाळी ७.०० ते ८.३० वाजेपर्यंत | खांदाड |
| सकाळी ७.३० ते १० वाजेपर्यंत | जुने माणगांव |
| सकाळी १२.०० ते पाणी पूर्ण होईपर्यंत | जुने माणगांव |
| सकाळी ८.३० ते १०.०० वाजेपर्यंत | साईनगर दत्तनगर |
| सकाळी १०.१५ ते ११.४५ वाजेपर्यंत | विरेश्र्वर नगर / दत्तनगर |
| दुपारी २.३० ते ४.३० वाजेपर्यंत | पूर्व बाजार लाईन / निजामपूर रोड/ गणेश कॉम्प्लेक्स / कचेरी रोड |
| संध्याकाळी ५.३० ते ७.०० वाजेपर्यंत | उतेखोल वाडी |
| संध्याकाळी ७.१५ ते ८.४५ वाजेपर्यंत | बालाजी लाईन |
| रात्री ९.०० ते १०.३० वाजेपर्यंत | ऑफिस लाईन / महालक्ष्मी लाईन |
